Ad will apear here
Next
‘विवेकवादी तत्त्वज्ञानाची गरज’
डॉ. गणेश देवी यांचे मत
डॉ. अब्दुल कादर मुकादम लिखित पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डॉ. गणेश देवी यांच्यासह अन्वर राजन, डॉ. मुकादम आदी

पुणे : ‘डॉ. अब्दुल कादर मुकादम यांचे ‘इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात’ हे पुस्तक मराठी भाषेत इस्लामी तत्वज्ञानाची मांडणी करणारे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. संवेदनशील विषयावर त्यांनी केलेली मांडणी वस्तुनिष्ठ आणि विवेकवादी परंपरा पुढे नेणारी आहे. पुरोगामी संघटनांनी, इस्लामविषयी जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने  हे पुस्तक मुळातून वाचले पाहिजे,’ असे मत राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.

‘इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात’ या डॉ. मुकादम लिखित पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देवी, प्रमोद मुजुमदार, अन्वर राजन, कलिम अजीम यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. देवी बोलत होते. डॉ. मुकादम यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

डॉ. देवी पुढे म्हणाले, ‘भाषा आणि तत्त्वज्ञानाची सांगड या  पुस्तकात घालण्यात आलेली आहे .राष्ट्र सेवा दलात  मुकादम यांची जडणघडण झाल्याने सेवा दलाचे संस्कार त्यांच्या लिखाणात दिसून येतात. मी या पुस्तकाचा कानडी अनुवाद करण्यासाठी प्रयत्न करेन आणि लवकरच ते कानडी वाचकांनाही उपलब्ध करून देण्यात येईल.’

 डॉक्टर मुकादम म्हणाले, ‘मागील पंधरा वर्षांपासून इस्लाम फोबिया सुरू आहे. मी इस्लाम तत्त्वज्ञानाची मांडणी आणि अभ्यास ४० वर्षांपासून करत  आहे. त्यासाठी मी पाश्चात्य संदर्भ वापरले आहेत. इस्लामबद्दल मराठीत वाचायला  मिळणारे लेखन  शंकास्पद आहे.’

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद मुजुमदार यांनी डॉ. मुकादम यांची प्रकट मुलाखत घेतली. सर्फराज अहमद यांनी सूत्रसंचालन केले. ‘दी मुस्लिम अकादमी’, ‘दक्षिणायन’ आणि ‘सलोखा’ या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZYRCD
Similar Posts
‘वडिलधाऱ्यांचा आदर हीच भारतीय संस्कृतीची शिकवण’ पुणे : ‘वडिलधाऱ्यांचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मात्र, आज दुर्दैवाने अनेकदा तरुणपिढीत त्याचा अभाव दिसतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जीवनाचा आनंद घेता येत नाही. सकारात्मक विचार आणून, त्रासून न जाता आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यासह इतरांचेही
डॉ. स्नेहल तावरे संपादित पुस्तकाचे प्रकाशन टोकियो : जपानमधील टोयो युनिव्हर्सिटी आणि स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्युटच्या वतीने ‘देश आणि विदेशातील बौद्ध दर्शन आणि बौद्ध संस्कृती यांचे विविधांगी स्वरूप’ या विषयावर १८ व्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. टोयो युनिव्हर्सिटीत सहा जून २०१९ रोजी ही परिषद झाली. या परिषदेला
‘आक्का, मी आणि....’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन पुणे : ‘महाराष्ट्र शारदा’ म्हणून ज्ञात असलेल्या प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांच्या सहवासातील आठवणींवर त्यांच्या स्नुषा वीणा संत यांनी लिहिलेल्या ‘आक्का, मी आणि....’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी, दि. ११ ऑगस्ट २०१९ रोजी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे
बुद्धांचा शांतीसंदेश आत्मसात करण्याची गरज : आचार्य सोनग्रा पुणे : ‘तथागत गौतम बुद्धांमुळे भारत विश्वगुरू झाला आहे. जगात शांतिदूत म्हणुन बुद्धांना सर्वत्र सन्मान आहे. हे विश्वगुरू पद टिकवण्यासाठी त्यांचे तत्त्वज्ञान टिकवणे महत्त्वाचे आहे. गौतम बुद्धांनी जो जगाला शांतीचा संदेश दिला आहे, त्याची आज प्रकर्षाने गरज भासत आहे. प्रत्येक देश छोट्या छोट्या गोष्टींवरून युद्ध करण्याची भाषा बोलत आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language